उभाबाजार परिसरात आज सुरळीत पाणी पुरवठा न झाल्यास अंघोळ आंदोलन – समीर वंजारी

*💫सावंतवाडी दि.२२-:* सावंतवाडी उभाबाजार परिसरात काल दिवसभर पाणी पुरवठा न झाल्याने शहरातील पाणी वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी शहरात एकच वेळ पाणी सोडण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला नागरिकांनी विरोध केल्यानंतर तो निर्णय मागे घेण्यात आला आहे. परंतु काल पूर्ण दिवस उभाबाजार परिसरात पाणी पुरवठा न झाल्याने तेथील नागरिक संतप्त झाले असून, आज मंगळवार दिनांक २२ डिसेंबर पर्यंत हा पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आंघोळ आंदोलन करण्याचा इशारा कॉंग्रेसचे सावंतवाडी उपतालुकाध्यक्ष समीर वंजारी यांनी दिला आहे. यावेळी पाणी पुरवठा न झाल्याने नगरपालिकेशी संपर्क साधला असता नगरपालिकेतून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानेच तेथील संतप्त नागरिकांनी पालिकेस निवेदन दिले असून, कॉंग्रेस उपतालुकाध्यक्ष समीर वंजारी यांनी आंघोळ आंदोलनाचा इशारा दिला आहे.

You cannot copy content of this page