कोकण रेल्वे स्थापना पुरस्कार साहित्यिक सुनील कांबळे यांना घोषित…

वैभववाडी प्रतिनिधी कोकण रेल्वेच्या ३१ वर्षांच्या पूर्णत्वाच्या टप्प्यावर आयोजित स्थापना दिवस समारंभात साहित्यिक सुनील कांबळे (हेतकर) यांना स्थापना दिवस पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. कोंकण रेल्वे द्वारा प्रतिवर्षी १५ आॅक्टोबर दिनी आयोजित स्थापना दिवसाच्या समारंभात, विविध विभागातील महत्त्वपूर्ण कामगिरी करणार्‍या कामगार‍ांना ‘स्थापना दिवस’ य‍‍ा पुरस्काराने सन्मानित करते. हा पुरस्कार अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक यांच्या स्तरावर दिला जातो. य‍ावर्षी हा पुरस्कार एकूण पंधरा कर्मचार्‍यांना दिला गेला आहे यामध्ये सुनील हेतकर यांनाही, त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरुप ₹ १०, ०००, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे आहे. सुनील कांबळे हे वाङमयीन क्षेत्रात सुनील हेतकर या नावाने परिचित अाहेत. त्यांचा ‘टेळका’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध असून ‘थेरीगाथा: स्त्रीमुक्ती, समाज आणि तत्त्वज्ञान’ हा महत्त्वपूर्ण संशोधनपर वैचारिक ग्रंथही प्रसिद्ध आहे. याशिवायही त्यांचे साहित्य प्रकाशित आहे. कवी, लेखक, संपादक, प्रकाशक असलेल्या सुनील हेतकर यांना आजवर संशोधन कार्यात भरीव कामगिरी केल्याबद्दल वसंत मून व इतर अनेक महत्त्वपूर्ण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सम्यक साहित्य संसद या वाङमयीन संस्थेचे ते विद्यमान अध्यक्ष असून वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ, मुंबई शाखेचे कार्याध्यक्ष आहेत. सामाजिक, वाङमयीन कार्यासोबत कोकण रेल्वेच्या सेवेतही ते आपले महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. या पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page