*⚡वेंगुर्ला ता.१७-:* महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिधुदुर्ग यांच आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत पॅन इंडिया अवेअरनेस कार्यक्रमांतर्गत विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून ११ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. वेंगुर्ला हायस्कूल येथ आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी न्यायाधीश श्रीमती के.के.पाटील यांनी बालिकांचे महत्त्व विशद केले. त्यानंतर वेंगुर्ला हायस्कूल ते कॅम्प परिसरात ‘बेटी पढाव, बेटी बचाव‘ ही जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. या रॅलीत न्यायाधीश पाटील यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक वर्ग, न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक पी.डी.कांबळे यांनी तर आभार श्री.सामंत यांनी केले. वेंगुर्ला हायस्कूलच्या आवारात वृक्षारोपण करुन कार्यक्रमाची सांगता झाली.
बालिका दिनानिमित्त जनजागृतीपर रॅली संपन्न
