*⚡वेंगुर्ला ता.१७-:* कै.अनुप अशोक वेंगुर्लेकर यांच्या स्मरणार्थ गुरुवार दि.२१ ऑक्टोबर रोजी रात्रौ ८ वाजता साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे लौकिक प्राप्त निवड कलाकारांचा ‘वज्रकर्ण मेघमाला‘ हा अजित गाडगीळ (मळेवाड) लिखित पौराणिक संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. या नाटकात सिद्धार्थ मेस्त्री, पप्पू नांदोसकर, दत्तप्रसाद शेणई, विठ्ठल गांवकर, संतोष चाळके, ओमप्रकाश चव्हाण, उदय राणे, आनंद नार्वेकर, विलास तेंडोलकर, सुधीर हळदणकर आदी भूमिका साकारणार असून यांना मयुर गवळी, पियुष खांदारे, विनायक सावंत आदी साथसंगित करणार आहेत. नाट्यरसिकांनी या नाटकाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
वेंगुर्ल्यात २१ रोजी ‘वज्रकर्ण मेघमाला‘ हा संयुक्त नाट्यप्रयोग
