वेंगुर्ला प्रतिनिधी-वेंगुर्ला येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात दस-यानिमित्त बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत दस-या दिवशी सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. दस-या दिवशी सायंकाळी रामेश्वर मंदिरासमोरील प्रांगणात आपट्याच्या झाडाची सोने म्हणून विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी हे सोने लुटले. यावेळी लुटलेले सोने प्रथम श्री देव रामेश्वरासह परिवार देवतांना अर्पण करण्यात आले. त्यानंतर भाविकांनी एकमेकांना सोने (आपट्याची पाने) देत दस-याच्या शुभेच्छा दिल्या.
रामेश्वर मंदिरात पारंपरिक पद्धतीने दसरा उत्सव संपन्न…
