नगरसेवक दिपक पाटकर यांच्याकडून ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचे वाटप

मालवण (प्रतिनिधी) कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिरचे संस्था संचालक व माजी सभापती उदय परब यांनी केलेल्या मागणीनुसार मालवणचे नगरसेवक दीपक पाटकर यांच्याकडून ओझर विद्यामंदिर मधील सर्व विद्यार्थ्यांसाठी सॅनिटायझर बॉटलचे वाटप करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ओझर विद्यामंदिर च्या सर्व विद्यार्थ्याना सॅनिटायझर बॉटल उपलब्ध व्हावी म्हणून संस्था संचालक माजी सभापती उदय परब यांनी मालवणचे नगरसेवक दिपक पाटकर यांच्याकडे मागणी केली होती. ग्रामीण भागातील कोरोनाची गांभीर्यता लक्षात घेऊन नगरसेवक पाटकर यांनी परब यांना तातडीने सॅनिटायझर बॉटलचा बॉक्स सुपूर्द केला. या सॅनिटायझर बॉटलचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. याप्रसंगी स्थानिक समिती अध्यक्ष किशोर नरे, मुख्याध्यापक प्रताप खोत, मुंबई संचालक माजी सभापती उदय परब, सत्यवान राणे, प्रवीण पारकर, पांडुरंग राणे, अभय शेर्लेकर, डि डि जाधव, शिवराम सावंत, नितीन परुळेकर, भास्कर पाताडे, रवीराज जाधव, प्रकाश खोडके,रणजित परब, माजी विद्यार्थी विशाल राणे आदी उपस्थित होते. सॅनिटायझर वाटपाबद्ल सर्वांनी नगरसेवक दीपक पाटकर यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page