सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा २७ डिसेंबर रोजी वारकरी मेळावा…

*💫कणकवली दि.२१-:* सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय,सिंधुदुर्ग चा वारकरी मेळावा २७ डिसेंबर २०२० कणकवली तालुक्यातील कळसुली भोगनाथ मंदिर येथे सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष मा.ह.भ.प.विश्वनाथ महाराज गवंडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून ह्या मेळाव्याचे आयोजन केले आहे या मेळाव्यात वारकरी संप्रदायातील मानाचा समजला जाणारा संतसेवा पुरस्कार प्रदान केला जाणार असून वारकरी दिनदर्शिका २०२१ चे प्रकाशन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वारकरी बांधव व विठ्ठल भक्त यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजू राणे सचिव सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

You cannot copy content of this page