खारेपाटण वायंगणी रस्त्यांसाठी निधी द्या…

खारेपाटण गावातील विकास कामांना बाबत पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन…

*💫कणकवली दि.२१-:* खारेपाटण येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.66 ते खारेपाटणला जोडणारा रास्ता ग्रामिन मार्ग क्र.14 0/000 ते 1.400 हा रस्ता सध्या पूर्णताह खराब झाला असून या रस्त्यावरून खारेपाटण बसस्थानक व बाजारपेठ येथे वाहतूक नेहमी सुरू असते. तर दुसरा रस्ता – खारेपाटण वायंगणी मार्ग (खारेपाटण बौद्धवादी बंदरगाव ते वायंगणी रस्ता) ग्रामीण मार्ग क्र.15 0/000 ते 2.500 या दोन्ही रस्त्यासाठी निधी मंजूर करावा,अशी लेखी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांचेकडे केली. कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावाच्या विविध विकास कामांबाबत येथील सामाजिक कार्यकर्त्या व सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना महिला आघाडी उपसंघटक सौ.मीनल तळगावकर यांनी नुकतीच जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांची सिंधुदुर्ग नगरी येथे भेट घेऊन लेखी निवेदन दिले. महाराष्ट्र् राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत नुकतेच सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत,शिवसेना नेते संदेश पारकर,जिल्हा महिला संघटक मधुरा पालव सावंत,माधवी दळवी, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खारेपाटण गावच्या सामाजिक कार्यकर्त्या व शिवसेना जिल्हा महिला आघाडी उपसंघटक सौ. मीनल तळगावकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली होती. तसेच खारेपाटण गावाची मध्यवर्ती ठिकाणी असणारी सार्वजनिक स्मशान भूमीची सुद्धा सध्या दुरावस्था झाली असून एकूण 12 वाड्यासाठी ही स्मशानभूमी वापरात येत आहे.मात्र येथे मयत व्यक्तीला जाळण्यासाठी खोडे हे फक्त दोनच असून अजून खोड्याची गरज आहे.तर शासनाच्या जनसुविधा योजनेतून येथील स्मशानभूमीचे सुशोभीकरण करून परिसराचा व बाजूचा परिसर विकास करणे कामी निधी मंजूर व्हावा. अशी देखील मागणी सौ.मीनल तळगावकर यांनी पालकमंत्र्याकडे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांचा लवकरच खारेपाटण गावभेट कार्यक्रम 15 जानेवारी 2021 नंतर होणार असून या दरम्यान ते खारेपाटण येथील राज्यात आदर्श शाळा म्हणून निवड झालेल्या जि. प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ ला भेट देणार असल्याचे तसेच खारेपाटण येथील व्यापारी बांधवांची भेट घेऊन त्यांचा समस्या जाणून घेणार असल्याची माहिती देखील यावेळी शिवसेना जिल्हा महिला कार्यकर्त्या सौ. मीनल तळगावकर यांनी दिली. .

You cannot copy content of this page