*⚡बांदा ता.१४-:* मुसळधार पाऊस, महापूर यातून वाचलेले भातपीक मंगळवारी रात्री सुमारे आठ ते नऊ फूट मगरीने पायदळी तुडवले तर काही ठिकाणी कापलेल्या पिकात मगरीचा वावर दिसून आला. भात कापणीस सुरुवात झाल्याने एकट्या शेतकऱ्याला शेतीत जाणे जिवावर बेतू शकते. याची कल्पना वनविभागाला दिली असून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सद्यस्थितीत मगरीमुळे झालेल्या भातपिकाचे नुकसानास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल मडुऱ्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.
मडुरा चवडीमळा परिसरात मगरीकडून भातपिकाची नासधूस
