आचरा हिर्लेवाडी येथे आज १३ रोजी डबलबारी भजन सामना!

*⚡मालवण ता.१३-:* नवरात्र उत्सवा निमित्त आचरा हिर्लेवाडी मुणगेकर आकार मंदिर येथे आज १३ ऑक्टोबर रोजी आमने सामने डबल बारी भजन सामना रात्री ९.३० वाजता होणार आहे. बुवा समीर महाजन (मुणगे, ता. देवगड) विरुद्ध बुवा सुजित परब ( हरकुळ, कणकवली) या दोहोंच्यात हा सामना होणार आहे. महाजन याना पखवाज तुषार परब, तबला सुनील बोरकर तर परब याना पखवाज अवधूत राणे, तबला पंकज सावंत साथ करणार आहेत.

You cannot copy content of this page