स्त्रीचा सन्मान… हाच प्रत्येकाचा अभिमान… चा संदेश

खारेपाटण महाविद्यालयातील स्वयंसेवकांकडून पथनाट्य

*⚡कणकवली ता.१३-:* खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष स्वयंसेवकांकडून आझादी का अमृतमहोत्सव या निमित्ताने गर्ल चाइल्ड इंटरनेशनल डेचे औचित्य साधून महिला हक्काशी संबंधित कौटुंबिक हिंसाचार, गर्भ चाचणी, विनय भंग, कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक व लैंगिक छळ आणि हुंडा बळी या बाबत पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. आजच्या आधुनिक काळात वावरणारी महिला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात सामाजिक असमानता, अत्याचार, आर्थिक परावलंबित्व आणि अन्य सामाजिक अत्याचारांना बळी पडताना दिसते जे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाच्या आड येत आहे. स्त्री-पुरुष समानता हा पहिला टप्पा आहे पण त्याही पुढे जायची गरज आहे. पुरुषांना स्त्रियांची सामर्थ्य न दिसणे आपण समजू शकतो, पण स्त्रियांनाही त्यांचा विसर पडला… का? असा प्रश्न उपस्थित करून याबाबत जनजागृती केली.या अनुषंगाने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष स्वयंवकांडून प्रत्येक स्त्रीचे सन्मान, हेच प्रत्येकाचे अभिमान असा संदेश पथनाट्याद्वारे देऊन एक माफक प्रयत्न करण्यात आलेला आहे. याप्रसंगी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, खारेपाटण चे सहसचिव तथा खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे, खारेपाटण ग्रामपंचयत सदस्य सौ.ऋतुजा कर्ले, प्रा.तानाजी गोदडे, प्रा.रश्मी देसाई, प्रा. डॉ. वंदना व्हटकर, प्रा.माधवी पांचाळ, प्रा. रोहीणी मर्ये व राष्ट्रीय सेवा योजना कक्ष जिल्हा समन्वयक तथा खारेपाटण महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.वसीम सय्यद, पत्रकार संतोष पाटणकर आदि मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना कक्ष विद्यार्थी प्रतिनिधी कु.अंकिता सुर्वे व कु.सिध्देश सावंत, कु.निलम पांचाळ, कु.तन्वी शिंदे, कु.वेदिका घाणेकर, कु.ॠतूजा जड्यार, कु.माधुरी शेट्ये, कु.यश राऊत, कु.सुजय पेडणेकर, कु. विनय सावंत, कु.विशाल शेलार, कु.जिग्नेश वारंगे यांनी या स्तुत्य उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सक्रीय सहभाग नोंदविला. सादर केलेले पथनाट्याचे निर्देशन राष्ट्रीय सेवा योजना कक्ष विद्यार्थी प्रतिनिधी कु. अंकिता सुर्वे यांनी केले.

You cannot copy content of this page