कणकवली तालुका राष्ट्रवादी व काँग्रेसच्यावतीने तहसीलदारांना निवेदन
*⚡कणकवली ता.११-:* उत्तर प्रदेश मधील घटनेच्या निषेधार्थ तसेच गुन्हेगारांवर कारवाई करावी यासाठी कणकवली तालुका राष्ट्रवादी व काँग्रेसच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे कणकवली तालुकाध्यक्ष राजू पावसकर, माजी तालुकाध्यक्ष राजेश पाताडे ,सुधाकर कर्ले ,सुधाकर ढेकणे, राष्ट्रीय काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण वरूनकर, डॉ. अभिनंदन मालंडकर, सागर वारंग, सिद्धेश बागवे ,संतोष टक्के आदी उपस्थित होते.
