गवळी तिठा येथून युवक बेपत्ता

केशकर्तनालयात होता कामाला

*⚡सावंतवाडी ता.११-:* गवळी तिठा परीसरातील एका केशकर्तनालयात काम करणारा युवक १९ सप्टेंबर पासून बेपत्ता झाला आहे. अनुप राजदेव ठाकूर (२९) रा.बाहेरचावाडा, असे त्याचे नाव आहे. तो सायंकाळच्या सुमारास चहा प्यायला जातो,असे सांगून दुकानातून निघून गेला. तो अद्याप पर्यंत माघारी न परतल्याने त्याचा भाऊ शैलेंद्र राजदेव ठाकूर यांने याबाबतची खबर पोलिसात दिली असून येथील पोलीस ठाण्यात नापत्ताची नोंद करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page