*💫मालवण दि.२१-:* मराठा शिक्षक संघटन सिंधुदुर्ग आयोजित गडकिल्ले स्वच्छता मोहिमे अंतर्गत संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त पहिली स्वच्छता मोहिम मालवण सिंधुदुर्ग किल्यावर राबविण्यात आली. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४५ मराठा शिक्षक बांधव सहभागी झाले होते. दोन ग्रुपमध्ये ही स्वच्छता मोहिम राबविली. पहिल्या गटाने संपुर्ण किल्यावरील प्लॅस्टिक बाँटल, प्लँस्टिक पिशव्या सुमारे सहा पिशव्याभरुन गोळा केल्या. तर दुसऱ्या गटाने महादेव मंदिर परिसर, दोन्ही विहिरी, भवानीदेवी मंदिर परिसर व टेहळणी बुरुज परिसर स्वच्छ केला. प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या या कामाचे कौतुक स्थानिक ग्रामस्थानी केले. या स्वच्छता मोहिमेत सहभागी शिक्षक दत्ताराम सावंत, नवनाथ बोराडे, श्रीकृष्ण सावंत, राजेंद्रप्रसाद गाड, संतोष राणे, गणेश सुरवसे, तानेश्वर गवस, एकनाथ बच्चे, प्रकाश तिर्लोटकर, अविनाश राणे, परमानंद वेंगुर्लेकर, सुनिल सावंत, देविदास प्रभुगांवकर, नवनाथ भोळे, के.पी.सावंत, सुशांत मर्गज, उमेश खराबी, अंकुश कनेरकर, भागवत अवचार, प्रदीप सावंत, मंगेश खांबाळकर, प्रशांत दळवी, नवनाथ जाधव, संदीप मिराशी, रणजीत देवकर, संभाजी पवार, प्रशांत शेलार, लव बारसकर, राकेश अहिरे, गुंडु निडंगारे, जालिंदर कदम, नाना यादव, मोहन देशमुख, श्री. बोडके, गणेश सुर्यवंशी, कौतीक मनगटे, रोमन किसनराव, सचिन राणे, दत्ता पवार, शैलेंद्र गायकवाड, औदुंबर माने, जगदिश शिंदे, माधव सावंत आदी सहभागी झाले. यात मालवण-१५ दोडामार्ग ५, कणकवली ५ देवगड १९, कुडाळ १ असे शिक्षक सहभागी झाले होते. मोहिम यशस्वी होण्यासाठी शिवराज सावंत व गणेश नाईक यांनी विशेष मेहनत केली. तसेच वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीचे विशेष सहकार्य लाभले.
मराठा शिक्षक संघटनतर्फे सिंधुदुर्ग किल्ल्यात स्वच्छता मोहीम
