युवा रक्तदाता संघटनेने वनविभागाचे वेधले लक्ष;सहाय्यक उपवनसंरक्षक आय. डी. जळगावकर यांना निवेदन
*💫सावंतवाडी दि.२१-:* सावंतवाडी शहरात वन्य माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. माकडांचा शहरवासीयांना होणाऱ्या त्रासाबाबत युवा रक्तदाता संघटनेने वनविभागाचे लक्ष वेधले. याबाबत सहाय्यक उपवनसंरक्षक आय. डी. जळगावकर यांना निवेदन देण्यात आले. सावंतवाडी शहरात वन्य माकडांचा उपद्रव वाढला असून मनुष्य वस्तीत प्रचंड प्रमाणात नासधूस केली जात आहे. शहरातील दुकानदारांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. यामध्ये दुकानदारांना मोठ्या आर्थिक नुकसानास सामोरे जाव लागत आहे. तसेच भर बाजारपेठ मध्ये माकडांपासुन चालत्या गाडीवर उड्या मारुन वाहन अपघात होत आहेत.घरांमध्ये घुसून घरातील वस्तू पळवून नुकसान होत आहे. या वन्य माकडांपासून शहरवासीयांना होणारा त्रास रोखण्यासाठी वनविभागा मार्फत योग्य ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी अशी मागणी नागरिक व व्यापा-यांच्यावतीने युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष श्री.देव्या सुर्याजी, सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी केली आहे. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अर्चित पोकळे, प्रथमेश प्रभु आदी उपस्थित होते.
