*⚡कणकवली ता.१२-:* घोटगे हेळेवाडी येथील गणेश शिंदे, प्रमोद शिंदे, कल्पेश नाईक यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आज आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कणकवली विजयभवन येथे शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून आ. वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. शिवसेनेचे घोटगे उपसरपंच गितेश सावंत, शाखा प्रमुख चंदन ढवळ यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले. गेले अनेक वर्षे भाजप पक्षाचे प्रामाणिक काम करून देखील गावात भाजप कडून विकासकामे केली जात नाहीत. याउलट आमदार वैभव नाईक यांनी गावात विकास कामांचा धडाका लावला आहे. गावातील व्यक्तींसाठी आ. वैभव नाईक सहज उपलब्ध होतात. त्यांच्या कार्यप्रणालीला प्रेरित होऊन आपण शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याचे प्रवेशकर्त्यांनी यावेळी सांगितले. यामध्ये संतोष पाताडे, महेश शिंदे,चंद्रकांत नाईक, सुजित चव्हाण, अंकुश शिंदे, विजय नाईक, तुळशीदास नाईक, शंकर रेडकर, प्रभाकर शिंदे ,आदींनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. यावेळी युवासेना विभागप्रमुख निशांत तेरसे, उपसरपंच गीतेश सावंत, शाखा प्रमुख चंदन ढवळ, भावेश परब आदी उपस्थित होते.
पुन्हा एकदा घोटगे येथील भाजप कार्यकर्त्यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
