*⚡सावंतवाडी ता.११-:* पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव डुबल (आप्पा) यांना पाठवलेल्या असंविधानिक भाषेच्या निषेधार्थ रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाने काम बंद आंदोलन करत आज तहसील कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत घोषणाबाजी करत निदर्शने केली यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघ अध्यक्ष किरण गजीणकर, उपाध्यक्ष कैलास गावडे, संघटक विनायक कोदे, वर्षा नाडकर्णी, नमिता कुडतरकर, भागीशिला शिंदे, विजय कविटकर, सुमित घाडीगावकर, स्वप्नील सोनसूरकर, एस व्ही नलावडे, नारायण भूनाथ आदी तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाने काम बंद आंदोलन करत केली निदर्शने
