महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष आमदार अशोक जगताप यांची मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड

कार्याध्यक्ष पदी चरणसिंग सप्रा

*💫मालवण दि.२०-:* कामगारांचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष व प्रवक्ते आमदार अशोक उर्फ भाई जगताप यांची मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी व कार्याध्यक्ष पदी चरणसिंग सप्रा यांची निवड झाल्या बद्दल आज सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने मालवण शहरात भरड नाक्यावर फटाके वाजवून आणि नागरिकांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. जिल्हा काँग्रेस सचिव बाळू अंधारी, मालवण तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी, युवाजिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, जिल्हा युवक प्रवक्ता अरविंद मोंडकर, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, युवक काँग्रेस विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्षा पल्लवी तारी, सरदार ताजर, इरफान शेख, प्रभाकर हेदुळकर, ममता तळगावकर, रिझवाना होलसेकर, मालवण तालुका युवक अध्यक्ष अमृत राऊळ, शहर अध्यक्ष गणेश पाडगावकर, सुबोध गावकर, जिल्हा युवक सचिव योगेश्वर कुरले, दिलीप तळगावकर, श्रीहरी खवणेकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भाई जगताप यांच्या माध्यमातून कोकणाचा सन्मान वरिष्ठांनी केला आहे असे बाळू अंधारी म्हणाले. जगताप यांच्यामुळे कोकणात पुन्हा काँग्रेस पक्ष उभारी घेईल, असे मेघनाथ धुरी म्हणाले. तर खऱ्या अर्थाने कामगारांना व त्यांच्या आवाजाला न्याय देण्याच काम भाई जगतापांच्या माध्यमातून पक्षाने केलं आहे, असे देवानंद लुडबे यांनी सांगितले. भाई जगताप हे कोकणातील असल्याने मुंबईत असलेल्या कोकणी चाकरमानी पदाधिकारी यांना देखील चांगली ऊर्जा मिळालेली असून भविष्यात मुंबईत व कोकणात देखील काँग्रेस पक्ष वाढीला या निवडीचा नक्कीच फायदा होणार आहे, असे अरविंद मोंडकर म्हणाले. भाई जगताप हे मालवण तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाऊ जगताप यांचे मोठे बंधू असून सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस वाढी साठी पुन्हा भाई जगताप या जिल्ह्यात सक्रिय होणार आहेत, असे पल्लवी तारी यांनी सांगितले.

You cannot copy content of this page