विद्यमान ग्रामपंचायत सदस्या, शाखा प्रमुखासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश*
*💫सावंतवाडी दि.२०-:* ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असतानाच भाजपने कोलगाव मध्ये शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या संदेशा संदेश वेंगुर्लेकर व शिवसेना शाखा प्रमुख विजय सावंत यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली व जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्या सोबत असंख्य शिवसैनिकांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. यावेळी माजी सरपंच राजन कुडतरकर , प्रभाकर राऊळ, सोसायटी चेअरमन चंदन धुरी, ग्राम सदस्य संदिप हळदणकर, संतोष राऊळ, संदेश टेमकर, सुरेश दळवी, फ्रॅकी डान्टस, संजय पाटणकर आदीं पदाधिकारी उपस्थित होते.
