भिरवंडे येथील पार्थ सावंतला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार

*💫कणकवली दि.२०-:* तालुक्यातील भिरवंडे खलांतर येथील पार्थ बाळकृष्ण सावंत याला राष्ट्रीय स्केटिंग खेळाडू म्हणून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषदेच्या वतीने या पुरस्काराचे वितरण नुकतेच नवी दिल्ली येथे झाले.राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2020 व्हीआयपी पर्सन पुरस्काराचे वितरण खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा क्षेत्रामध्ये राष्ट्रीयपातळीवर केलेल्या अतुलनीय अलौकिक कामगिरीबद्दल देशपातळीवरील हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पार्थ सावंत हे भिरवंडे खलांतर येथील अण्णा मास्तर या प्रतिष्ठित घराण्यातले आहेत. शासकीय ठेकेदार संजय सावंत यांचे ते पुतणे आहेत मुंबईतील जोगेश्वरी येथे सावंत कुटुंबीय राहत असून पार्थने अतिशय मेहनतीने राष्ट्रीय स्केटिंग खेळाडू म्हणून प्रतिष्ठा मिळाली आहे. त्यांच्या यशाबद्दल भिरवंडे पंचक्रोशीतून अभिनंदन केले जात आहे.

You cannot copy content of this page