*💫कणकवली दि२०-:* नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा खुल्या काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी दिली. किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक ,साहित्य क्षेत्रात कार्यरत असून सदर चॅरिटेबल ट्रस्टच्या 9 जानेवारी रोजी नांदगाव येथे होणाऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात प्रामुख्याने जिल्हास्तरीय खुल्या काव्य लेखन स्पर्धेचा समावेश आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या कवीला 1000 रुपये आणि सन्मानचिन्ह, द्वितीय विजेत्या कवीला 750 रुपये आणि सन्मानचिन्ह, तृतीय विजेत्या कवीला 500 रुपये आणि सन्मानचिन्ह अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या कवींचा वर्धापनदिन सोहळ्यात मान्यवर कवींच्या उपस्थित गौरव करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कवींनी आपली एक कविता 30 डिसेंबर पर्यंत -पुढील व्हाट्सअप नंबरवर पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे. कविता पाठविण्यासाठी व्हाट्सअप नंबर संपर्क ऋषिकेश मोरजकर -9096564410
मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे काव्यलेखन स्पर्धा-कवींना सहभागी होण्याचे आवाहन
