उल्लेखनीय कामगिरीबद्दल पो. काँ. संदीप राठोड यांचा पो. उपमहानिरीक्षक मोहिते यांनी केला गौरव

*💫वैभववाडी दि.२०-:* करूळ घाटातील अपघातात चालकाचे प्राण वाचविणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड यांचा पोलीस महानिरीक्षक डॉ. संजय मोहिते यांनी गौरव केला. येथील पोलिस ठाण्याला कोकण परिक्षेत्र नवी मुंबईचे पो. उपमहानिरीक्षक श्री. मोहिते यांनी भेट दिली. यावेळी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, सावंतवाडी पोलीस उपअधीक्षक रोहिणी साळुंखे, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पो. उपनिरीक्षक प्रवीण देसाई आदी उपस्थित होते. 25 ऑक्टोबर रोजी मैद्याने भरलेला ट्रक करूळ घाटातील खोल दरीत कोसळला होता. त्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला होता. करूळ चेक नाक्यावर ड्यूटी बजावत असणारे राठोड त्या चालकासाठी देवदूत ठरले होते. राठोड यांनी त्या चालकाला मोठ्या धाडसाने दरीतून बाहेर काढले होते. त्यामुळे त्या चालकाचे प्राण वाचले. या त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या कामगिरीबाबत तसेच पोलिस ठाण्याचे कामकाज, परिसर स्वच्छतेबाबत श्री. मोहिते यांनी समाधान व्यक्त केले.

You cannot copy content of this page