१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अनुदानित, विनाअनुदानित, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा
*💫सिंधुदुर्गनगरी दि.२०-:* जुनी पेन्शन योजना अधिसूचना शालेय शिक्षण विभागाने अखेर मागे घेतल्यामुळे १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त केलेल्या अनुदानित, विनाअनुदानित, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाने याबाबत जुनी पेन्शन योजना कायम ठेवावी अशी मागणी वारंवार जुनी पेन्शन संघटनेच्यावतीने तसेच अनेक शिक्षक संघटनांच्यावतीने आंदोलन, उपोषण, मोर्चा काढून लक्ष वेधले होते. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत नुकतीच शिक्षक व पदवीधर आमदार यांची बैठक होवून ही अधिसूचना मागे घेण्याचा निर्णय घेतला. १० जुलै च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने खाजगी शाळा कर्मचारी यांना १९८१ मधील सेवा शेती बदल अधिसूचना जारी केली होती, या अधिसूचनेत १० नोव्हेंबर पूर्वी ज्याचे नेमणुका झाले आहेत अशा सर्वांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत शासनाने आता विना विलंब विना अट कार्यवाही करावी आणि कुटुंबपमुख म्हणून शिक्षणमंत्री यानी न्याय द्यावा अशी, मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
