प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी घेतली सदिच्छा भेट

सावंतवाडी : कॉंग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सावंतवाडी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील बुथ कमिटीचा परफॉर्मन्स चांगला आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपरिषद आदी निवडणुकीत सावंतवाडी तालुका कॉंग्रेस कमिटीला पक्ष पुर्ण ताकद देणार, महाराष्ट्र कॉंग्रेस तुमच्या सोबत आहे असा शब्द नाना पटोले यांनी यावेळी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी सावंतवाडी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, सरचिटणीस रूपेश आईर, शहराध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page