सोनाली कोदे-तळाशीलकर यांच्या प्रयत्नातून हडी शेलटीवाडीत निवाराशेड

ग्रामस्थातुन समाधान

मालवण (प्रतिनिधी) मालवण पंचायत समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान सदस्या सौ. सोनाली कोदे-तळाशिलकर यांच्या माध्यमातून हडी शेलटीवाडी येथे प्रवाशांसाठी मंजूर झालेल्या निवारा शेडचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थ व प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. शेलटीवाडी येथे निवारा शेड मंजूर होण्यासाठी हडीचे माजी सरपंच सुशील शेडगे यांनी सोनाली कोदे यांच्याकडे मागणी केली होती. शेडसाठी लागणारी जागा हि प्रमोद प्रभाकर मांजरेकर व त्यांचे कुंटुंबीय यांच्याकडून विनामुल्य हडी ग्रामपंचायतीस देण्यात आली आहे. प्रवाशांच्या निवार्‍याची गैरसोय लक्षात घेवून सुसज्ज अशी निवारा शेड उपलब्ध करुन दिल्याबद्दल शेलटी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री. विलास रेवंडकर, सचिव बापू वस्त व शेलटी ग्रामस्थ यांनी सोनाली कोदे यांचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page