उदघाटन कार्यक्रमाचा घेतला आढावा
*⚡कुडाळ ता.३०-:* माजी खासदार तथा भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी नुकतीच चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळाला भेट दिली व विमान सेवा शुभारंभ तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली व बंड्या सावंत उपस्थित होते .यावेळी विकासक कंपनीचे किरणकुमार प्रकल्प अधिकारी राजेश लोणकर श्री ,सकपाळ शिंदे आदी उपस्थित होते यावेळी निलेश राणे यांनी 9 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या विमानसेवा आणि त्याबाबतची तयारी याबाबत तसेच उद्घाटन कार्यक्रम बाबत माहिती दिली. यावेळी चिपी माजी सरपंच प्रकाश चव्हाण,परुळे सरपंच धनश्री चव्हाण , कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत, प्रकाश राणे, भाजप युवा मोर्चाअध्यक्ष प्रसाद पाटकर, शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे, संजय दूधवडकर आदी उपस्थित होते . यावेळी विमान तळ प्राधिकारण चे किरणकुमार यांनी माहिती दिली की, सिंधुदुर्ग विमानतळ शुभारंभ कार्यक्रम हा निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत होईल कारण covid-19 च्या प्रादुर्भावामुळे काळजी घेण्यात आली आहे. तसेच हा विमानतळ राज्यातील दुसर्या क्रमांकाचा ग्रीनफिल्ड विमानतळ आहे. यावेळी स्थानिक भूमिपुत्रांना रो जगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासन किरण कुमार यांनी दिली.
