वॉटर स्पोर्टस सर्व्हेचे सर्टिफिकेट देण्याचीही तत्परता बंदर विभागाने दाखवावी

वॉटर स्पोर्टस व्यावसायिक अन्वय प्रभू यांची मागणी

*💫मालवण दि.१९-:* लॉकडाऊन नंतर अनलॉक प्रक्रियेत जिल्हाधिकाऱ्यांनी वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय चालू करण्यास दिलेली परवानगी आणि नंतर बंदर विभागाने वॉटरस्पोर्ट्स बंदीचे दिलेले आदेश या फेऱ्यात वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिक अडकलेले असताना राज्यातील वॉटरस्पोर्ट्स सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिल्याने वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून वॉटरस्पोर्ट्स बाबत आदर्श कार्यप्रणाली ( sop ) नसल्याच्या कारणावरून व्यावसायिकांवर कारवाई करण्याची तत्परता दाखविणाऱ्या बंदर विभागाने वर्षभर रखडवून ठेवलेले वॉटरस्पोर्ट्स सर्व्हेचे सर्टिफिकेट देण्यातही तत्परता दाखवून आपली कार्यतत्परता दाखवावी अशी मागणी मालवणचे वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिक अन्वय प्रभू यांनी केली आहे. कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यापासून गेले आठ महिने मालवणसह कोकण किनारपट्टीवरील वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय बंद होता. पर्यटन सुरू झाल्यानंतर वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय सुरू करण्याच्या मागणीने जोर धरल्याने स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी यांनी वॉटरस्पोर्ट्स सुरू करण्यास परवानगी दिली होती. यामुळे वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकांना दिलासा मिळाला होता. मात्र काही दिवसांनी बंदर विभागाने वॉटरस्पोर्ट्स बंदीचे आदेश काढत नोटिसा बजावून कारवाईचा बडगा उगारला होता. गेले आठ महिने नुकसान सहन केले असताना पुन्हा बंदर विभागाने बंदी आदेश काढल्याने व्यावसायिकांनी आक्रमक होत व्यवसाय सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली. त्यामुळे बंदी आदेश असताना तसेच कोरोना काळात वॉटरस्पोर्ट्स बाबत आदर्श कार्यप्रणाली नसताना व्यवसाय सुरू ठेवल्याच्या कारणास्तव बंदर विभागाने व्यावसायिकांवर कारवाई केली. यामुळे व्यावसायिकांनी आणखी आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर वॉटरस्पोर्ट्स परवानगीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्यावर काल मुख्यमंत्र्यांनी वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. याबाबत बोलताना वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिक अन्वय प्रभू म्हणाले, वॉटरस्पोर्ट्स पुन्हा सुरू करण्यास परवानगी मिळावी म्हणून सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मालवणातील वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकानी आभार मानले आहेत. मात्र या काळात वॉटरस्पोर्ट्स बाबत आदर्श कार्यप्रणाली नसल्याच्या कारणावरून व्यावसायिकांवर कारवाई करण्याची तत्परता दाखविणाऱ्या बंदर विभागाने वर्षभर रखडवून ठेवलेले वॉटरस्पोर्ट्स सर्व्हेचे सर्टिफिकेट देण्यातही तत्परता दाखवावी असे सांगतानाच वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकांची भावना ओळखून त्यांना रोजी रोटी मिळवून देणारा वॉटरस्पोर्ट्स व्यवसायाला आदर्श कार्यप्रणाली (sop) देणारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे , बंदर मंत्री अस्लम शेख, खासदार नारायण राणे, आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांचे वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकांनी आभार मानल्याचे श्री प्रभू यांनी सांगून ही परवानगी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणारे आणि आम्हाला सहकार्य करणारे राष्ट्रीय काँग्रेसचे अरविंद मोंडकर, बाळू अंधारी, भाजपचे बाबा मोंडकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांचेही आभारी असल्याचे ते म्हणाले

You cannot copy content of this page