सावंतवाडी न.पा.च्या आर्थिक स्थितीवरून विरोधी गटनेत्या अनारोजीन लोबो आक्रमक

गरज नसताना अतिरिक्त कंत्राटी कर्मचारी भरल्याचा आरोप

*⚡सावंतवाडी ता.२८-:* नगरपालिकेच्या आज पार पडलेल्या मासिक बैठकीत पालिकेच्या आर्थिक स्थितीवरून विरोधी गटनेत्या अनारोजीन लोबो आक्रमक झाल्या होत्या. गरज नसताना देखील अतिरिक्त कंत्राटी कर्मचारी भरल्यामुळेच ही परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप त्यानी यावेळी केला आहे. यावर कोरोना मुळे घरपट्टी वसुली थांबल्यामुळे तिजोरीत खळखळाट निर्माण झाला आहे. येत्या काही महिन्यातच सर्व वसुली होऊन सर्वकाही ठीक होईल असे स्पष्टीकरण नगराध्यक्ष संजू परब यांनी दिले आहे.

You cannot copy content of this page