सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करणार :समीर नलावडे

साई सुरभी बेस्ट हॉटेल तर मामाचो गांव बेस्ट अग्रो टुरिझमने सन्मानित

*⚡कणकवली ता.२७-:* कणकवलीत दर वर्षी पर्यटन महोत्सव आयोजित करत आहोत,नगरपंचायत पर्यटन दृष्टीने उपक्रम कणकवलीत राबविले जात आहेत.कणकवलीत धबधबा निर्माण करण्याचे काम नगरपंचायतने हाती घेतले आहे . त्यामुळे वर्षा पर्यटनासाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही.सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था ,फेडरेशन अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांना कोणतीही मदत आपण करण्यास तयार आहोत असे आश्वासनही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिले. कणकवली येथे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडरेशन कार्यक्रमात पर्यटन व्यवसायिकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले,याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर, फेडरेशन अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर,प्रा. हरिभाऊ भिसे,नंदन वेंगुरलेकर,सचिव नितीन तळेकर,खजिंनदार यशवंत आमोणेकर व पर्यटक व्यवसायिक उपस्थित होते. परशुराम उपरकर म्हणाले,पर्यटनासाठी आपल्याकडे जिल्ह्यामध्ये शासकीय अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करतात. पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना योग्य रस्ते उपलब्ध नाहीत.देवबाग,तारकर्ली जलक्रीडासाठी मोठे पर्यटन स्थळ आहे. तसेच आंबोली देखील मोठे पर्यटन क्षेत्र असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. कोरोना काळात दोन वर्षे पर्यटकांना नुकसान सोसावे लागले आहे. बहुतेक पर्यटकांची परदेशी जाण्याची मानसिकता राहिली नाही. त्यामुळे त्याचा फायदा पर्यटन व्यवसायिकांनी घ्यायला हवा. पुन्हा पर्यटनास सुरुवात करून आपली प्रगती करावी. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडेरेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारामध्ये सावंतवाडी येथील हॉटेल साई सुरभीला सन 2021चा बेस्ट हॉटेल पुरस्कार तर हिर्लोक,ता. कुडाळ येथील मामाचो गांवला बेस्ट अग्रो टूरिझम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 27 स्प्टेंबरच्या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हयातील विविध क्षेत्रातील पर्यटन व्यावसायिकाना प्रोत्साहन देण्यासाठी सन 2010 पासून सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडरेशनतर्फे असे पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करणेत येतो. त्यानुसार यावर्षी बेस्ट फूड पुरस्कार सावंतवाडी येथील आरेकर्स रेस्टॉरंट,बेस्ट सर्विसेस पुरस्कार आंबोली येथील ग्रीन ग्रास रिसॉर्ट,बेस्ट हॉस्पिटयालिटी पुरस्कार देवगड येथील वृंदावन न्याहारी निवास हॉटेलला जाहिर करण्यात आला. याशिवाय बेस्ट इको टूरिझम अँड व्हिडीओग्राफी पुरस्कार सावंतवाडी येथील रानमानुसला,बेस्ट बॅक वॉटर टूरिझम अवॉर्ड देवबाग येथील महालक्ष्मी वॉटर स्पोर्ट्स याना जाहिर करणेत आला आहे. विविध पर्यटकाना मार्गदर्शन करणाऱ्या मालवण च्या गणेश गाईड सर्विसेस ला बेस्ट गाईड अवॉर्ड ,वायरी-तारकर्ली येथील दादा वेंगुरलेकर बीच हाऊसला बेस्ट सर्विसेस अवॉर्ड आणि मालवण च्या मालवण आपत्कालिन ग्रुप याना बेस्ट साहस शौर्यवीर या विशेष पुरस्काराने सन्मानित करणेत आले आहे. आणि बेस्ट मेडिकल टूरिझम म्हणून नेरूर, ता. कुडाळ येथील आजोळ-ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय पर्यटन केंद्र यांना जाहिर करणेत आला आहे . [यावेळी सिंधुदुर्ग पर्यटन विकास संस्था फेडरेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, सचिव नितीन तळेकर,खजिंनदार यशवंत आमोणेकर हे उपस्थित होते.

You cannot copy content of this page