कै दिनकर गंगाराम सामंत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचा मदतीचा हात
*⚡सावंतवाडी ता.२७-:* कै. दिनकर गंगाराम सामंत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट , मुंबई यांच्या माध्यमातून झाराप येथील लक्ष्मीकांत सामंत या ४८ वर्षीय कॅन्सर ग्रस्त रुग्णाला औषधोपचारासाठी १० हजार रूपयांची आर्थिक मदत केली असून, त्याचा धनादेश त्यांच्या पुतण्याकडे डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला आहे.
