घरगुती गणपतींसह कणकवली पोलीस ठाण्यातील गणपतीला देण्यात आला निरोप

*⚡कणकवली ता.२६-:* गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला…असा जयघोष करीत 17 दिवसांच्या घरगुती गणपतींसह कणकवली पोलीस ठाण्यातील गणपतीचे विसर्जन करण्यात आले. लाडक्या बाप्पाला निरोप देताना भक्तांचे अंतकरण भरून आले होते. बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. बाप्पाच्या भक्तीत गणेशभक्त लीन झाले होते. रविवारी सायंकाळी गणेशभक्तांनी गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या…असा जयघोष कणकवली शहरातील गणपती सानासह तालुक्यात ठिकठिकाणी असलेल्या विसर्जनस्थळी गणेशमूर्त्यां आणल्या होत्या. त्यानंतर गणेशमूर्तींचे विसर्जन करून गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप दिला. बाप्पाला निरोप देताना भाविक भावूक झाले होते. कणकवली पोलीस ठाण्यातील गणपतीची साध्यापद्धतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूक पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्यासह अधिकारी व महिला पोलीस कर्मचारी या मिरवणूक सहभागी झाले होते. त्यानंतर गणपती साना येथे भावपूर्ण वातावरणात गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

You cannot copy content of this page