नानिवडेतील भाजपच्या 60 कार्यकर्त्यांचा सतीश सावंत यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश

*💫वैभववाडी दि.१९-:* नानिवडे येथील भाजपच्या ६० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी जिल्हा बॕंक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. नानिवडे वाडेकरवाडी येथील दीपक साळवी, प्रवीण वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली सिध्देश साळवी, दत्ताराम जाधव, हरी वाडेकर, राम गावडे, बाळकृष्ण साळवी, वनिता वाडेकर, भूमिका गावडे, सुगंधा साळवी, आरती गावडे, वंदना साळवी, सुनंदा गोरुले, वासंती शिवगण, प्रभावती वाडेकर यांच्यासह ६० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी संदेश पटेल, युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी, तालुका संघटक अशोक रावराणे, उपतालुका प्रमुख सुरेश पांचाळ, उपतालुका संघटक बाबा मोरे, विभागप्रमुख बाबा खाडये, पप्या पालांडे, युवासेनाप्रमुख अतुल सरवटे, सुर्यकांत महाजन आदी उपस्थितीत होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना सतीश सावंत म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचे शिवसैनिक प्रत्येक घराघरात तयार करा.आपल्या गावाच्या विकासाची जबाबदारी ही शिवसेनेची राहील.असा विश्वास त्यांनी दिला.

You cannot copy content of this page