*⚡कणकवली ता.२६-:* कणकवली तालुका शिवसेनेची बैठक आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवानेते संदेश पारकर,अतुल रावराणे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी नवरात्र उत्सव २०२१ साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच नवरात्रोत्सव मंडळाची निवड करण्यात आली. यावेळी उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी राजू शेट्ये व खजिनदारपदी राजू राणे यांची निवड करण्यात आली. या मंडळाचे सदस्य म्हणून शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, अनिल हळदीवे, सुशांत नाईक, हर्षद गावडे, भालचंद्र दळवी, सचिन सावंत, राजू राठोड, प्रदीप मसुरकर, सुदाम चव्हाण, सुदाम तेली, भास्कर राणे, रूपेश आमडोस्कर, बाळू पारकर, तेजस राणे, निलम सावंत, स्नेहा तेंडोलकर, प्रतिक्षा साटम, साक्षी आमडोसकर यांची निवड करण्यात आली.
शिवसेना कणकवली नवरात्रोत्सव मंडळ अध्यक्षपदी राजू शेट्ये तर खजिनदार राजू राणे
