योगेश करंदीकर यांच्याकडून कळसुलकर शाळेस १०८ पुस्तके प्रदान

*⚡सावंतवाडी ता.२५-:* प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री योगेश वसंत करंदीकर यांनी आज प्रशालेस सदिच्छा भेट देत आपल्या संग्रहातील अनमोल १०८ पुस्तकांची देणगी प्रशालेस दिली. याप्रसंगी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, मुख्याध्यापक एन. पी. मानकर व प्रशालेचे माजी विद्यार्थी सचिन बिर्जे आदी उपस्थित होते. योगेश करंदीकर यांच्या दातृत्वाबद्दल डॉ. प्रसाद नार्वेकर यांनी करंदीकर त्यांचे आभार व्यक्त केले.,

You cannot copy content of this page