*⚡सावंतवाडी ता.२५-:* उर्वी फाउंडेशनच्या माध्यमातून मळगांव इंग्लिश स्कूलच्या सायकल बँकसाठी दोन सायकल भेट देण्यात आल्या. उर्वीच्या स्मृती प्रित्यर्थ तिच्या स्मृतिदिनी शनिवारी हा कार्यक्रम मळगाव हायस्कूल येथे संपन्न झाला. उर्वीचे आजोबा सिताराम व आजी सुजाता पुळसकर यांच्या हस्ते प्रशालेतील दोन विद्यार्थिनींना या सायकल सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी मळगाव हायस्कूलच्या मुंबई ऐक्यवर्धक संघाचे खजिनदार नंदकिशोर राऊळ, संचालक रामचंद्र केळुसकर, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य मनोहर राऊळ, पत्रकार सचिन रेडकर, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, तुकाराम पुळसकर, नितेश सावंत, प्रशालेचे मुख्याध्यापक वैजनाथ देवण, पर्यवेक्षक श्रद्धा सावंत, पालक सुरेंद्र गावडे प्रशालेचे कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या. उर्वीचे पालक रोहन पुळसकर यांनीही ऑनलाइन उपस्थित राहत या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. उर्वी फाऊंडेशन ही मुंबईस्थित सामाजिक संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम नेहमी राबविले जातात. यापूर्वीही मळगाव हायस्कूलच्या विविध गरजांसाठी या संस्थेने वेळोवेळी मदत केली आहे. अलीकडेच झालेल्या पूरहानीच्या वेळीदेखील उर्वी फाउंडेशनने पूरग्रस्तांना मोठा मदतीचा हात दिला होता. याच पार्श्वभूमीवर पूर्वीच्या स्मृतिदिनी माळगाव हायस्कूलच्या सायकल बँक साठी दोन सायकल भेट म्हणून देण्यात आल्या. या दोन्ही सायकल प्रशालेच्या सायकल बँकेत राहणार असून बँकेच्या माध्यमातून त्या विद्यार्थिनींना देण्यात येणार आहेत. अलीकडेच माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून या सायकल बँक साठी दहा सायकल भेट देण्यात आल्या होत्या. प्रशालेतील मुख्याध्यापक व अन्य शिक्षक तसेच इतर दाते यांच्या माध्यमातूनही या बँकेत सायकल देण्यात आल्या आहेत. अजूनही काही विद्यार्थिनींना सायकल ची आवश्यकता असल्याने एकदा त्याने त्यासाठी कशाले शी संपर्क करावा असे आवाहन यावेळी पर्यवेक्षक श्रद्धा सावंत यांनी केले तसेच सायकल भेट देणाऱ्या उर्वी फाउंडेशनचे व पुळसकर कुटुंबीयांचे त्यांनी प्रशालेच्या वतीने आभार व्यक्त केले.
उर्वीचे आजोबा सिताराम व आजी सुजाता पुळसकर यांच्या हस्ते सायकल केल्या सुपूर्द
