महात्मा गांधी विद्यालय श्रावण शाळेला अशोकराव यादव यांनी दिली देणगी

*⚡कणकवली ता.२५-:* मालवण तालुक्यातील श्रावण गावचे रहिवाशी, मुंबई येथे पीएसआयपदी पदोन्नती झालेले अशोकराव बाळकृष्ण यादव यांनी महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1 शाळेला भेट देऊन दहा हजार रुपयांची देणगी दिली. याबद्दल शाळेच्यावतीने त्यांचे आभार मानून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी केंद्रप्रमुख नितीन कदम , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवराम परब केंद्रमुख्याध्यापक स्मिता किंजवडेकर, सहाय्यक शिक्षक रागिणी ठाकूर ,विनायक हरकुळकर आणि इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page