निधी नसताना पंप खरेदी करण्यास का सांगितले

प स सदस्य पेडणेकर आक्रमक

*⚡सावंतवाडी ता.२४-:* पंचायत समितीकडे निधी नसल्याने दोन योजनांना निधी देण्यावरून सदस्यांमध्ये वाद झाला. यावेळी निधी नसताना शेतकऱ्यांना पंप का खरेदी करण्यास सांगितले असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावेळी आपण केलेल्या कामाचा निधीवर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आपण खाली बसणार नाही असे सांगत सदस्य पेडणेकर हे सभागृहात ठिय्या मांडून उभे राहिले होते. यावेळी विशेष सभेला देखील त्यांनी विरोध केला. आज पंचायत समिती येथे मासिक बैठक पार पडली.

You cannot copy content of this page