३० सप्टेंबर पूर्वी ऍपद्वारे पीक पाहणी नोंद करा

पीक पाहणी ऍपचे गावोगावी मार्गदर्शन सुरू

वैभववाडी प्रतिनिधी राज्यात सर्वत्र ३० सप्टेंबर अखेर शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या शेतातील पिकांची नोंद ई पीक पाहणी ॲप च्या माध्यमातून करायची आहे. वैभववाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडील ॲंड्रॉइड फोनची उपलब्धता व ॲंड्रॉइड फोन वापरण्याचे कौशल्य यांची कमतरता लक्षात घेता वैभववाडी महसूल विभागाने तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना ई पीक पाहणी ॲप कसे वापरायचे, याबाबत माहिती व मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथे अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालयात वैभववाडीचे तहसीलदार रामदास झळके व महसूल विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना ॲप कसे वापरायचे याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी तहसीलदार रामदास झळके, नायब तहसीलदार निंबाळकर, प्रशालेचे मुख्याध्यापक डी. एस. पाटील, महसूल विभाग कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाचे धडे घेतल्यानंतर आता वैभववाडी तालुक्यातील विद्यार्थी ई पीक पाहणी ॲप चे धडे घेताना दिसत आहेत. आजचे विद्यार्थी ॲंड्रॉइड मोबाईल वापरण्यात अगदी तरबेज आहेत. शिवाय ऑनलाईन शिक्षणामुळे बहुतांश विद्यार्थ्यांकडे ॲंड्रॉइड फोन उपलब्ध आहे. याचा विचार करून महसूल विभागाने तालुक्यातील विद्यार्थ्यांना ई पीक पाहणी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या योजनेत सहभागी करून घेतल्याचे दिसून येते.

You cannot copy content of this page