मळगाव ब्राम्हणपाठवाडीतील घटना;३ लाख ३२ हजार रुपयांचे दागिने लंपास
*⚡सावंतवाडी ता.२३-:* गणपतीसाठी गावी आलेल्या चाकरमान्यांची बॅग चोरीस गेल्याची घटना मळगाव ब्राम्हणपाठवाडीत घडली आहे. त्या बॅगेत ३ लाख ३२ हजार रुपयांचे दागिने ठेवण्यात आले होते. हा प्रकार काल उघडकीस आला असून, सबंधित महिलेने पोलिस स्थानकात धाव घेत अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
