फोंडाघाट नवी कुर्ली वसाहत येथे ई पीक पाहणीबाबत मार्गदर्शन

राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा पुढाकार

*⚡कणकवली ता.२३-:* राज्य शासनाच्या ई पीक पाहणी या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये मोबाईल अॅपदवारे पिकांची प्रत्यक्ष नोंदणी व पिकांची माहिती छायाचित्रांसह शेतकऱ्यांनी अपलोड करावीत .या संदर्भातील माहिती देण्यासाठी फोंडाघाट नवी कुर्ली वसाहत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या निवासस्थानी तहसीलदार आर.जे.पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ अधिकारी प्रभूदेसाई ,लोरे तलाठी जंगले , फोंडा तलाठी कांबळे ,रघुनाथ कुलकर्णी, सकाराम हुंबे ,स्नेहा सावंत ,सुनीता राणे ,प्रवीण पार्टे देवेंद्र पिळणकर ,तुषार पिळणकर, जयेश चव्हाण ,दाजी येंदे बाबू सावंत , सचिन सावंत , तुषार गुरव ,राजू गोसावी , प्रशांत बोबाते ,विठोबा नारकर ,गणेश निकम , पूजा येंडे ,तनय सावंत , आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी परिसरातील शेतकरी हजर होते.

You cannot copy content of this page