माजी खासदार निलेश राणे यांनी मानधन देत दिला दिलासा
*⚡मालवण ता.०१-:* कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता एकीकडे राज्य सरकार व्यक्त करीत असताना दुसरीकडे अस्तित्वात असलेली कोविड सेंटर बंद करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. या पार्श्वभूमीवर मालवण शहरातील कोविड सेंटर बंद करून या सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय ग्रामीण रुग्णालयाने घेताच या निर्णयाला नातेवाईकांनी आक्षेप घेतला. दरम्यान ही माहिती भाजपच्या तालुकाध्यक्षांकरवी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांना मिळताच त्यांनी रुग्ण असेपर्यंत कंत्राटी कामगारांचे मानधन देण्याचे मान्य करीत चिंदरकर यांच्या मार्फत वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये तीन रुग्ण आहेत. हे कोविड सेंटर बंद करून त्यांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय आरोग्य प्रशासनाने घेतला त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला ही माहिती मालवण भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांना समजताच त्यांनी माजी खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले यावेळी निलेश राणे यांनी रुग्णांचे ओरोस येथे होणारे स्थलांतर टाळत रुग्णांच्या सेवेसाठी आवश्यक असणाऱ्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या दोन नर्स तसेच दोन वॉडबॉय यांचे मानधन देण्याचे मान्य करीत हे मानधनही तात्काळ चिंदरकर यांच्या मार्फत वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. त्यामुळे याठिकाणी दाखल असलेल्या तीन रुग्णांचे स्थलांतर टळले आहे. यावेळी श्री. चिंदरकर यांच्या समवेत महेश मांजरेकर उपस्थित होते. मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये तीन रुग्ण आहेत. हे कोविड सेंटर बंद करण्यात येत असल्याचे समजताच निलेश राणे यांनी रुग्णांचे ओरोस येथे होणारे स्थलांतर टाळत रुग्णांच्या सेवेसाठी आवश्यक असणाऱ्या दोन नर्स तसेच दोन वॉडबॉय यांचे मानधन देण्याचे मान्य केले. *नगराध्यक्षा कडूनही कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन* दरम्यान, मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनीही वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांची भेट घेत कोविड सेंटरमधील रुग्णांचे ओरोस येथे स्थलांतर करू नये असे सांगत कोविड सेंटरमधील एक नर्स आणि एक वॉडबॉय यांचे मानधन देण्याचे मान्य केले. यावेळी त्यांच्या समवेत नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत उपस्थित होते.
