अप्पर कोषागार अधिकारी भा.शा. सावंत निवृत्त

*⚡ओरोस ता.०१-:* जिल्हा कोषागार कार्यालयातील अप्पर कोषागार अधिकारी भालचंद्र शां. सावंत हे 31 ऑगस्ट 2021 रोजी नियत वयोमानानुसार प्रदिर्घ अशा 30 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाले. कोषागार कार्यालयात लिपिक पदावर ते 29 जुलै 1991 रोजी हजर झाले. त्यानंतर ते एम.पी.एस.सी ची परीक्षा देवून MFAS या संर्वगात प्रवेश केला. त्यांनी महाराष्ट्र राज्य लॉटरी, जिल्हा ग्राहक मंच, अशा विविध पदांवर काम केले आहे. निवृत्तीच्या वेळी ते अप्पर कोषागार अधिकारी सिंधुदुर्ग या पदावर काम करत होते. शासकीय सेवेत काम करत असताना त्यांनी स्वत:चे छंद जोपासले ते नियमित बॅडमिंटन खेळत तसेच सायकलिंक व ट्रेकिंग मध्ये सुध्दा त्यांना रस आहे. वेळात वेळ काढून ते आनंदाश्रम येथे भेट देऊन वृध्दांबरोबर काही क्षण घालवीत. अशाप्रकारे त्यांच्या कामाबद्दल तसेच इतर गुणांबाबत कोषागारातील कर्मचारी, इतर कार्यालयातील सहकारी व कोषागार अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यावेळी अन्य कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page