केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सावंतवाडीत प्रतिपादन;जनतेच्या आशीर्वादामुळेच आतापर्यंत मंत्रीपदे भूषविल्याचेही केले जाहीर
*⚡सावंतवाडी ता.२८ प्रसन्न गोंदावळे-:* केंद्रात मंत्री पद मिळाल्यानंतर पावणे दोन महिन्यानंतर महाराष्ट्रात केवळ माझ्या जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. अवघ्या १५ – १६ वर्षाचा असताना मी शिवसेनेचा सदस्य झालो आणि त्यानंतर माझ्या राजकीय वाटचालीला सुरुवात झाली. त्यानंतर मी जी काही पदे भूषवली ती केवळ माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या आशीर्वादाने अशा शब्दात नारायण राणे यांनी आपल्या भावना सावंतवाडी कर जनतेच्या समोर व्यक्त केल्या आहेत. यावेळी येणाऱ्या निवडणुका मध्ये संपूर्ण जिल्हा भाजपमय करणार असल्याचं निर्धार त्यानी केला असून, विरोधकांचा एकही उमेदवार एकही निवडणुकीत निवडून येणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
