शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकभारतीचे सलग चौथ्या दिवशीही बेमुदत साखळी उपोषण सुरूच

*⚡ओरोस ता.२६-:* कोरोनाच्या आगमनापासून शाळेचे दरवाजे बंद झाल्याने सध्या बहुतांश विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाऊ लागले आहेत.विद्यार्थ्यांचे हे नुकसान कधीही भरून निघणारे नाही म्हणून लवकरात लवकर शाळा सुरू करा.. जिल्ह्यासह राज्यातील शाळा अनलाॅक करण्याच्या मागणीसाठी शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटनेच्या माध्यमिक शिक्षकांनी सिंधुदुर्ग जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले असून गुरुवारी चौथ्या दिवसी कणकवली तालुक्यातील शिक्षक भारतीच्या माध्यमिक शिक्षकांनी दिवसभर हे आंदोलन छेडले आहे. कोविड 19च्या नियमांचे पालन करीत तालुका अध्यक्ष प्रसाद मसुरकर, कार्याध्यक्ष संजय भोसले,सचिन आर्लेकर,देवेंद्र सावंत,मारूती कुंभार हे पाच शिक्षक प्रत्यक्षात उपोषणाला बसले होते तर जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, राज्य प्रतिनिधी सी.डी.चव्हाण, उपाध्यक्ष जनार्दन शेळके,अनंत सावंत, जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मारकड, जिल्हा महिला सचिव प्रगति आडेलकर, राजा घुगे, अपर्णा म्हालदार,मुकेश पवार,उमेश सावंत अमोगसिध्द,श्री. पुजारी,विजय ठाकर,विश्वास धुरी,चंद्रकांत ग. चव्हाण,यांच्यासह जिल्ह्यातील इतर माध्यमिक शिक्षकांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शविला. दरम्यान माजी आमदार प्रमोद जठार व माजी आमदार राजन तेली यांनीही उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांबरोबर प्रदिर्घ चर्चा केली व आपले म्हणणे शासन दरबारी मांडण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.तसेच आपल्या मागण्या रास्त असून आमचाही आंदोलनाला पुर्णपणे पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले.

You cannot copy content of this page