एक वेळ राज ठाकरे यांच्या हाती सत्ता द्या आणि विकासाची ब्लू प्रिंट प्रत्यक्षात अनुभवा
*⚡कणकवली ता.२६-:* भाजप आणि शिवसेनेला विकासाबाबत काही देणेघेणे नाही ही केवळ एकमेकांना शिव्या देणे ,आरोप करणे आणि प्रसिद्धी मिळवणे हा त्यांचा धंदा आहे, हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2014 च्या निवडणूकीत सांगितले होते. त्याची खात्री पटत असून जनतेच्या विकासाच्या कोणत्याही गोष्टी भाजप- शिवसेनेने केलेल्या नाहीत हे राज ठाकरे यांचे म्हणणे खरे असल्याची अनुभूती ती जनतेला आले आहे.त्यामुळे एक वेळ राज ठाकरे यांच्या हाती सत्ता द्या आणि विकासाची ब्लू प्रिंट प्रत्यक्षात अनुभवा असे आवाहन मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी केले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काढलेली जन आशीर्वाद यात्रा ही जनतेला ताप यात्रा झाली असल्याचा टोला परशुराम उपरकर यांनी लगावला. कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर बोलत होते ते म्हणाले, भाजपाची जन आशीर्वाद यात्रा विकासकामे ,केंद्राच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी येत असल्याचे सांगण्यात येत होते परंतु या जन आशीर्वाद यात्रा यापेक्षा जनतेला ताप देण्यासाठीची यात्रा असल्याचे दिसून आले आहे .राडा संस्कृती सुरू झाल्याने जनता भयभीत झाली आहे .मात्र ‘ही परशुरामाची भूमी आहे त्यामुळे इथेच करा आणि इथेच भोगा ‘हे या यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्र्यांना समजले असेल असे सांगताना सांगताना परशुराम उपरकर म्हणाले, 2005च्या राणे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यात अडचणी निर्माण करण्याचे काम राणे यांनी केले होते. नागपंचमी असल्याने राज ठाकरे मालवणहुन थेट मुंबईला गेले त्यांना कणकवलीत सभा घेता आली नाही .अशी अवस्था राणे यांच्या अटकेच्या निमित्ताने झाली असून त्यावेळीची आठवण आली असेल असे सांगताना उपरकर म्हणाले,एका केंद्रीय मंत्र्याला अटक व्हावी लागते यामुळे कोकणातील जनतेची बदनामी झाली आहे .कोकण राडे बाजांचा जिल्हा आहे का ?असा सवाल निर्माण होत आहे . वेंगुर्ले येथे दोस्तीचा हात ठेवणारे खास.विनायक राऊत यांना राणे कुटूंबियांची दोस्ती कशी असते याची अनुभूती आली असेल असे सांगताना उपरकर म्हणाले ,टोलसाठी झोल करण्याचा प्रयत्न राऊत यांनी केला असला तरी दोस्तीची चर्चा मात्र शिवसैनिकांच्या मनातून गेली नसल्याचे त्याने सांगितले. जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्र्यांचा दौरा होत असताना त्याचा फायदा नेमका कोणाला झाला ?जनतेला महागाई व बेकारी बसून तोंड द्यावे लागत आहे ?तर मग या यात्रा कशासाठी असा सवाल परशुराम उपरकर यांनी करताना शिवसेना आणि भाजप गतवेळच्या सत्तेत असतानाही भांडत होती आणि आता आताही भांडत आहे .त्यामुळे आघाडीतील दोन पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी बघ्याची भूमिका घेत आहेत . कोकणच्या विकासाचे प्रकल्प हे सरकार पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे लोकांना रोजगार द्यायचं असेल आणि कोकणातील तरुणांचा लोंढा कोकणातच थांबवायचं असेल तर राज ठाकरे यांच्या हाती ती एक वेळेस सत्ता देऊन पहा, कोकणचा निश्चितपणे विकास होईल असे यावेळी मनसे सरचिटणीस परशुराम म्हणाले.
