विठ्ठल रखुमाई संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी
*⚡सावंतवाडी ता.०७-:* सावंतवाडी तालुक्याचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची करण्यात आलेली बदली रद्द करून डिसेंबर पर्यंत त्यांना मुदतवाढ द्यावी अशी मागणी श्री विठ्ठल रखुमाई संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी निवेदनाद्वारे महसूल मंत्री बाळा थोरात यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात असे नमूद केले की तहसीलदार म्हात्रे यांनी सावंतवाडी तालुक्यात रुजू झाल्यानंतर उत्तम असे काम करत गोरगरीब दिंन दुबळ्या नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे. कोरोना काळात देखील त्यांनी स्वतःचा खिशातील पैसे खर्च करून अनेक गोर गरीब, परप्रांतीय कामगार यांना मदत केली होती. तसेच कोव्हिड सेंटर मध्ये जाऊन चांगले काम करत सेंटरमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे प्राण वाचवत त्याला मानसिक आधार दिला होता. याच काळात चक्रीवादळ, महापूर सारख्या कठीण प्रसंगात देखील त्यांनी लोकांना धीर देऊन मदत केली आहे. तसेच गाळेल येथे घडलेल्या घटनेवेळी त्या युवकाचा शोध लागेपर्यंत मोहीम थांबू दिली नाही . अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची रजा राखीव म्हणून बदली करणे योग्य नसून, या बदलीला तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांचा या बदलीला विरोध असल्याचे मत देखील त्यानी या निवेदनातून मांडले आहे.
