तातडीची लोकांपर्यंत पोहोचविण्याची तहसीलदारांकडे मागणी
*⚡सावंतवाडी ता.३१-:* माडखोल धवडकी येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची आज काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी भेट देत पाहणी केली. तर महापुरातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा तसेच शासनाने जाहीर केलेली दहा हजार रुपयांची तातडीची मदत लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचवा अशी मागणी देखील यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे करण्यात आली. माजी सरपंच संजय लाड बबन डिसोजा जाकी डिसोजा आदी पदाधिकारी उपस्थित होते
