दरड कोसळल्याने गढूळ झालेय पाणी
*⚡बांदा दि.२९-:* बांदा गाळेल गावातील दरड कोसळल्याने येथील पिण्याचे पाणी गढूळ झाल्याने आज सावंतवाडी नगरपालिकेने टँकरद्वारे पिण्याचे पाणी येथील सर्व नागरिकांना देण्यात आले. बांदा गाळेल येथे आठवड्या भरापूर्वी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. या गाळेल भागातील नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे. भूस्खलनामुळे या भागातील पिण्याचे पाणी या माती मुळे गढूळ झाल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली याच पाश्वभूमीवर आज गुरुवारी सावंतवाडी नगरपालिकेने गाळेल भागातील सर्व नागरिकांना टँकर च्या सहाय्याने पिण्याचे पाणी देण्यात आले.डिंगणे गाळेल सरपंच संजय डिंगणेकर, विनायक नाईक, नारायण आसोलकर, बांदिवडेकर आदी उपस्थित होते.
