Headlines

मडुरा पुलाचा निर्णय उद्या ठरणार

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आश्वासनाकडे मडुरा दशक्रोशीचे लक्ष;सकारात्मक निर्णय न झाल्यास स्वातंत्रदिनी उपोषण-:सरपंच सुरेश गावडे यांचा इशारा

*⚡बांदा दि.२९-:* मडुरा-सातोसे-कवठणी-किनळे रस्त्यावरील श्री देवी माऊली मंदिर पुल व सातार्डा येथील मोरीपूलाच्या मंजुरीसाठी मडुरा पुलावर बेमुदत उपोषण छेडण्यात आले होते. जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी नैसर्गिक आपत्कालीनमधून पुलासाठी निधी देणार असल्याचे ठोस आश्वासन दिल्यामुळे छेडण्यात आलेले उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. उद्या शुक्रवारी संबंधित विभागाचे सर्व अधिकारी व उपोषणकर्ते प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेऊन पुलाचे काम नेमके कधी सुरू होणार या संदर्भात निर्णय होणार असल्याचे सौ. सावंत यांनी सांगितले होते. त्यामुळे उद्या शुक्रवारी होणाऱ्या निर्णयाकडे मडुरा दशक्रोशीचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रोणापाल सरपंच सुरेश गावडे म्हणाले की, शुक्रवारी जर पुलाच्या कामास मंजुरी वा कामाची सुरुवात कधी होणार याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास प्रशासनास कोणतीही पूर्वकल्पना न देता 15 ऑगस्टला बेमुदत उपोषण छेडण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा त्यांनी दिला.

You cannot copy content of this page