मळगाव येथे रेल्वेची धडक बसून अज्ञात इसमाचा मृत्यू…?

*⚡सावंतवाडी दि.२९-:* मळगाव येथे रेल्वेची धडक बसल्यामुळे अज्ञाताचा इसमाचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार आज दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडला. सावंतवाडी रेल्वे स्थानकाजवळ मळगाव येथे रेल्वे ट्रॅकवर छिन्नविच्छिन्न अवस्थेतएका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना व पोलिसांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्यानुसार रेल्वे कर्मचाऱ्यांसह पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आहेत. मृतदेहाची अजून ओळख पटली नसून ही आत्महत्या की अपघात हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

You cannot copy content of this page